
रावेत : गेल्या अनेक महिन्यांपासून रावेतमधील मुकाईनगर परिसरातील महानगरपालिकेचे जिजाऊ क्लिनिक आणि नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र डॉक्टरांविना चालू आहे. बाह्य रुग्णसेवा विभाग (ओपीडी) पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयाचा किंवा दूरच्या शासकीय रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.