..
ॲड रवींद्र पगार यांचे निधन
नाशिक,ता. ३ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र नाना पगार (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवारी (ता.४) दुपारी तीनला उत्राणे, (ता.बागलाण) येथे होणार आहे. २०१२ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. नाशिक महापालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणून काम केले होते. संघटनात्मक कामकाजाचा सुमारे ४० वर्षांचा अनुभव असलेल्या ॲड. रवींद्र पगार यांनी एकत्र काँग्रेसमध्ये युवक काँग्रेस व एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्षपद देखील सांभाळले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

