आरबीआयकडून ४९ एनबीएफसींची नोंदणी रद्द

आरबीआयकडून ४९ एनबीएफसींची नोंदणी रद्द
Published on: 

बिगर बँकिंग वित्त कंपन्यांची
रिझर्व्ह बँकेकडून नोंदणी रद्द

६३ संस्थांवर कारवाई : एका गृहनिर्माण वित्त कंपनीकडूनही परवाना परत


नवी दिल्ली, ता. १६ (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ४९ बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) नोंदणी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. तसेच १३ ‘एनबीएफसी’ अन् एका गृहनिर्माण वित्त कंपनीने (एचएफसी) स्वेच्छेने आपले परवाने परत केले आहेत. त्यामुळे एकूण ६३ वित्तीय संस्थांवर नियामक कारवाई करण्यात आली आहे.

‘आरबीआय’ने १६ नोव्हेंबरला जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आरबीआय कायदा, १९३४ मधील कलम ४५-आयए (६) अंतर्गत ४९ कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली. यासंबंधीचे आदेश १ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जारी करण्यात आले होते. दरम्यान, १३ ‘एनबीएफसी’ आणि एका गृहनिर्माण वित्त कंपनीने स्वतःहून नोंदणी प्रमाणपत्रे परत केली. त्यानुसार संबंधित कायद्यांतील तरतुदींनुसार त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली.

यापैकी सहा कंपन्यांनी बिगर बँकिंग वित्तीय व्यवसाय बंद केल्यामुळे परवाने परत केले. अन्य पाच कंपन्यांचे वर्गीकरण ‘नोंदणीची आवश्यकता नसलेल्या प्रकार-१ एनबीएफसी’मध्ये करण्यात आले आहे. विहित निकष पूर्ण केल्यामुळे त्यांना आरबीआयकडे नोंदणी करणे आवश्यक नाही. उर्वरित तीन कंपन्यांचे विलीनीकरण, विसर्जन किंवा स्वेच्छेने नोंदणी रद्द झाल्यामुळे कायदेशीर अस्तित्व संपुष्टात आले आहे. परवाने परत केलेल्या कंपन्यांत मनीष सिंथेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड, अमर प्लाझा अँड होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड, विकोनिक व्यापार प्रायव्हेट लिमिटेड आणि ब्राव्हो कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. नोंदणी रद्द झालेल्या कंपन्या आता ‘आरबीआय’ कायद्यानुसार बिगर बँकिंग वित्तीय संस्थेचा व्यवसाय करू शकणार नाहीत, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.