esakal | रिझर्व्ह बॅंकेकडून पुणे जनता सहकारी बँकेला ३० लाखांचा दंड
sakal

बोलून बातमी शोधा

RBI

रिझर्व्ह बॅंकेकडून पुणे जनता सहकारी बँकेला ३० लाखांचा दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: रिझर्व्ह बँकेने पुणे जनता सहकारी बँकेला तीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या ‘सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क’च्या दिशानिर्देशाचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बॅंकेने परिपत्रकात नमूद केले आहे.

रिझर्व्ह बॅंकेने पुणे जनता सहकारी बँकेच्या ३१ मार्च २०१९ रोजी आर्थिक स्थितीच्या संदर्भात वैधानिक तपासणी केली. तपासणी अहवाल आणि इतर सर्व पत्रव्यवहाराच्या तपासणीत बँकेने निर्देशांचे पालन केले नसल्याचे समोर आले. निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का आकारला जाऊ नये, याबाबत जनता बँकेला रिझर्व्ह बॅंकेकडून नोटीस जारी करण्यात आली.

त्यावर बँकेने नोटिशीला दिलेले उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीदरम्यान दिलेली माहिती विचारात घेतली. त्यानंतर पुणे जनता बॅंकेने निर्देशांचे पालन न केल्याचा निष्कर्ष काढत आर्थिक दंड लावण्याचा निर्णय घेतला, असे रिझर्व्ह बॅंकेच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात बॅंकेत संपर्क साधला असता, ‘रिझर्व्ह बॅंकेने आम्हाला संधी दिली होती. त्यानुसार बॅंकेची बाजू मांडण्यात आली आहे,’ असे सांगण्यात आले.

loading image
go to top