
RBI Glitch
Sakal
पुणे : रिझर्व्ह बँकेने ‘एकाच दिवशी धनादेश वटविणे’ ही प्रणाली लागू करूनही प्रत्यक्षात ग्राहकांच्या खात्यात रक्कम वेळेत जमा होत नसल्याचे समोर आले आहे. धनादेश देणाऱ्याच्या खात्यातून पैसे जात (डेबिट) असले तरी ज्याला धनादेश दिला आहे, त्याच्या खात्यात मात्र ते पैसे जमा (क्रेडिट) होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)’च्या सिस्टिममधील काही तांत्रिक त्रुटींमुळे धनादेश वटण्यास विलंब होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.