esakal | महापालिकेचा अर्थसंकल्प वाचा सोप्या पद्धतीने | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal

महापालिकेचा अर्थसंकल्प वाचा सोप्या पद्धतीने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे भलेमोठे पुस्तक समजून घेणे तसे कठीण काम आहे. पण आता हा समजण्यास अवघड असलेला अर्थसंकल्प सोप्या भाषेत मांडण्याचे काम पॉलिसी रिसर्च आॅर्गनायझेशन (पीआरओ) व गोखले इंस्टिट्यूटच्या या अभ्यास गटाने केले आहे. हा सोपा अर्थसंकल्प आॅनलाइन उपलब्ध करून दिला आहे. हा अहवाल राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींपुढेही मांडला जाणार आहे.

शहराचा अर्थसंकल्प हा प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा असतो. तो जेथे रहातो, काम करतो यापासून ते शहरात प्रवास करताना त्यासाठी काय होणार आहे? कोणत्या सुविधा मिळणार आहेत? ही प्रत्येक गोष्ट या अर्थसंकल्पात असते. पण महापालिकेकडून केलेल्या बोजड मांडणीमुळे नागरिक हा अर्थसंकल्प समजून घेण्यात रस दाखवत नाहीत.

पुणेकरांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी पीआरओने प्रकल्प हाती घेतला आहे. सलग दोन महिने अभ्यास करून महापालिकेचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प संक्षिप्त व सुटसुटीतपणे मांडला आहे. तसेच शहरातील सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांच्या समोरही हा अहवाल मांडला जाणार आहे, अशी माहिती पीआरओच्या संचालिका नेहा महाजन व विश्‍वस्त तन्मय कानिटकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पीआरओच्या या पहिल्या प्रकल्पामध्ये सायली जोग, मनोज जोशी, रुचिता झिंगाडे, शर्वरी साळुंखे, कुशाल ढाके, नेहा महाजन यांनी काम केले आहे.

या ठिकाणी बघा अहवाल - www.policyresearch.in या संकेतस्थळावर मराठी व इंग्रजीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

loading image
go to top