वाचनातून समृद्ध जीवनाची जडण-घडण ः रवींद्र मुळे

वाचनातून समृद्ध जीवनाची जडण-घडण ः रवींद्र मुळे
Published on

PNE26W44140
अहिल्यानगर ः जिल्हा वाचनालयाच्या निबंध स्पर्धेत सुमन धिरडे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करताना उद्योजक रवींद्र मुळे व वाचनालयाचे पदाधिकारी.
-------------
वाचनाने जीवन समृद्ध
रवींद्र मुळे ः जिल्हा वाचनालयाच्या निबंध स्पर्धेचा निकाल
अहिल्यानगर, ता. २२ ः देशात क्रांती करणारे अनेक महापुरुष हे वाचनातून, साहित्यातून घडले. आपली सुप्त मनशक्ती, कल्पनाशक्ती आणि खऱ्या अर्थाने समृद्ध जीवनाची कला ही वाचनातून निर्माण होते, असे प्रतिपादन उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मुळे यांनी केले.
जिल्हा वाचनालयातर्फे आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा, स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, सहकार्यवाह राहुल तांबोळी, संचालक किरण आग्रवाल, शिल्पा रसाळ, प्रा. ज्योती कुलकर्णी, ग्रंथपाल अमोल इथापे आदी उपस्थित होते.
निबंध स्पर्धा खुला गट ः सुमन प्रभाकर धिरडे - प्रथम, समृद्धी थोरात - द्वितीय, तेजल दादासाहेब शिंदे - तृतीय, शालेय गट ः आर्या मोहन शिंदे-प्रथम, तन्मय पडोळे व शुभंकर माळवदे - द्वितीय, स्वरा टाकसाळे व अस्मी सप्तर्षी-तृतीय.
स्वाती रानडे, डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. शिल्पा रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ज्योती कुलकर्णी यांनी स्वागत केले. किरण आग्रवाल यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com