Sakal Vidya
sakal
पुणे - तुम्हाला डॉक्टर होण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे असेल, तर हे तुमच्यासाठीच आहे. वैद्यकीय प्रवेशाबाबत मनातील शंकांचे निरसन, प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी पालकांना ‘सकाळ विद्या’च्या ‘एमबीबीएस ॲडमिशन सेमिनार २०२६’मधून मिळणार आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थी-पालकांच्या मनातील संभ्रमाला या सेमिनारमधून पूर्णविराम मिळणार आहे.