एनडीएच्या उपप्रमुखपदी रिअर अ‍ॅडमिरल अतुल आनंद यांची नियुक्ती

एनडीएच्या उपप्रमुखपदी रिअर अ‍ॅडमिरल अतुल आनंद यांची नियुक्ती

पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिकेच्या (एनडीए) उप प्रमुख आणि प्रमुख प्रशिक्षक पदी रिअर अ‍ॅडमिरल अतुल आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल यांच्याकडून आनंद यांनी आज पदभार स्विकारला. 

रिअर अ‍ॅडमिरल अतुल आनंद यांनी 'सी हॅरियर स्क्वॉड्रन आयएनएएस 300' चे मार्गदर्शक अधिकारी आणि 'डिस्ट्रॉयर आयएनएस' दिल्लीचे कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्यांचे वडिल सुद्धा एनडीएच्या 13 व्या तुकडीचे माजी विद्यार्थी होते. तर आनंद हे 71 एनडीएच्या तुकडीचे सदस्य होते. दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्याल आणि बांग्लादेश येथील डिफेन्स सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत. त्यांना त्यांचा कामाबद्दल अतिविशिष्ट पदक देऊन गौरविण्या आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आनंद यांनी नौदलाच्या टोरपेडो रिकव्हरी व्हेसल, ए 72, मिसाईल बोट आयएनएस चेतक, कार्वेट आयएनएस खुकरी, आएनएस मुंबई या जहाजांचे प्रमुख म्हणून काम केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com