म्हणून, उद्धव ठाकरे पुण्यातील परिषदेला अनुपस्थित राहणार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

पुणे : पोलिस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) संस्थेमध्ये होत आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत ही बैठक दिल्लीच्या बाहेर घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलीय. ही बैठक पहिल्यांदाच पुण्यात होणार आहे. पण, बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार आहेत. 

पोलिस महासंचालक परिषदेला देशभरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहतात. त्यात देशाच्या राष्ट्रीय सुरक्षे संदर्भात चर्चा होत असते. पुण्यातील बैठकीला या अधिकाऱ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसेच तपास यंत्रणांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. देशातील गुन्हे, अंतर्गत सुरक्षा, आव्हाने या विषयांवर चर्चा होत असताना, कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीला उपस्थित राहता येत नाही, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर महाराष्ट्रात स्वागत करतील आणि पुन्हा मुंबईला निघून जातील. 

महत्त्वाची बातमीसत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच होणार नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेट; पण कुठं?
 
कोठे कोठे झाली परिषद

पंतप्रधान मोदींनी 2014नंतर ही परिषद दिल्लीबाहेर घेण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये कच्छ तसेच गुवाहटी, हैदराबादमधील राष्ट्रीय पोलिस अकादमी, बीएसएफच्या टेकनपूर येथील अकॅडमीत आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात यापूर्वी ही परिषद झाली आहे. पुण्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात पहिल्यांदा ही परिषद होत आहे.

WebTitle : for this reason uddhav thackeray will not be present for the conference in pune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for this reason uddhav thackeray will not be present for the conference in pune