Vidhan Sabha 2019 : शिरुरमधून कंद, बांदल, कोलतेंची बंडखोरी; उद्या होणार चित्र स्पष्ट

निलेश कांकरिया
Sunday, 6 October 2019

Vidhan Sabha 2019 :  वाघोली : शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदीप कंद, मंगलदास बांदल व डॉ चंद्रकांत कोलते यांनी बंडखोरी केली आहे तर, युती असतानाही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी अर्ज भरला आहे. बंडखोरी रोखण्यात दोन्ही पक्षाला कितपत यश येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. माघारी नंतरच चित्र स्पष्ट होईल. 
 

Vidhan Sabha 2019 :  वाघोली : शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदीप कंद, मंगलदास बांदल व डॉ चंद्रकांत कोलते यांनी बंडखोरी केली आहे तर, युती असतानाही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी अर्ज भरला आहे. बंडखोरी रोखण्यात दोन्ही पक्षाला कितपत यश येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. माघारी नंतरच चित्र स्पष्ट होईल. 

दोन विद्यमान जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके व प्रदीप कंद तर दोन माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ चंद्रकांत कोलते व मंगलदास बांदल अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. या शिवाय वाघोलीतील अॅड नरेंद्र वाघमारे, उद्योजक सुधीर पुंगलिया यांचाही समावेश आहे. जिल्ह्यात शिवसेनेला मतदार संघ न मिळाल्याने युती असतानाही शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके हे रिंगणात आहेत तर, राष्ट्रवादीने उमेदवारी न दिल्याने प्रदीप कंद यांनी बंडखोरी केली. याशिवाय कोलते व बांदल हे ही राष्ट्रवादीचे बंडखोर आहेत. 

१८ उमेदवारांनी २२ अर्ज दाखल होते.  छाननीमध्ये तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर, १५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. पक्षाच्या प्रमुख उमेदवारांमध्ये आघाडीचे अशोक पवार, युतीचे बाबूराव पाचर्णे, मनसेचे कैलास नरके, संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर घाडगे, बहुजन मुक्ती पार्टीचे अमोल लोंढे, वंचित बहुजन आघाडीचे चंदन सोंडेकर, बहुजन समाज पार्टीचे रघुनाथ भावर यांचा समावेश आहे. 

राष्ट्रवादीकडून तीन जणांनी बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादीची बंडखोरी रोखण्यात यश आल्यास पवार व पाचर्णे यांच्यात चुरशीची लढत होईल. प्रदीप कंद यांनी उमेदवारी ठेवल्यास तिरंगी लढत होईल. मात्र कंद यांच्यामुळे राष्ट्रवादीची डोखेदुखी वाढेल. मंगलदास बांदल यांनी आंबेगाव मतदार संघातूनही अर्ज दाखल केला आहे. 2014 निवडणुकीत पवार व पाचर्णे यांच्यातच दुरंगी लढत झाली होती. शहरी मतदानाचा टक्का वाढल्याने ती मतेही विजयासाठी महत्वाची ठरणार आहेत. माघारी नंतरच चित्र स्पष्ट होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rebellion of Kand, Bandal, Kolte in Shirur Constituency for Vidhan Sabha 2019 Of Maharashtra