BJP
पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड असल्याने उमेदवारी अर्ज वाटप करताना प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. तरीही नाराज झालेल्या इच्छुकांनी अपक्ष अर्ज भरून बंडखोरीचे संकेत पक्षातील नेत्यांना दिले होते.
पण गेल्या दोन दिवसात मंत्री, आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या नाराजांच्या घरी जाऊन भेटून, काहींना फोनवरून बोलून त्यांची समजूत काढली. त्यामुळे अनेक प्रभागांतील बहुतांश नाराजांची बंडखोरी शमविण्यात भाजपला यश आले आहे, तर काही प्रभागांत बंडखोरीचे आव्हान कायम आहे.