Coupleesakal
पुणे
Pune News : मोबाईलचा मर्यादित वापर करण्याच्या अटीवर पुन्हा जुळला संसार
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे पती-पत्नी एकमेकास हवा तेवढा वेळ देवू शकत नसल्याचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवर दिसून येत आहे.
पुणे - मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे पती-पत्नी एकमेकास हवा तेवढा वेळ देवू शकत नसल्याचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवर दिसून येत आहे. यातील काही प्रकरणे अगदी घटस्फोटापर्यंत पोचले आहेत. अशाच एका प्रकरणात पती-पत्नीत पाच वर्षांनंतर समेट झाली असून मोबाईलचा वापर मर्यादित स्वरूपात करण्याच्या अटीवर ते पुन्हा एकत्र आले आहेत. गणेश चतुर्थीला गणपती बसवत त्यांनी एकमेकांच्या विरोधात केलेले न्यायालयीन दावे मागे घेत संसाराची सुरुवात केली आहे.

