पुण्यात ढगफुटी; 87.3 मिमी पावसाची नोंद; आठ वर्षांतील उच्चांक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

का कोसळला भयंकर पाऊस? 
- अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्प येत आहे. 
- पुण्यात हवेतील आद्रतेचे प्रमाण 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. 

पुणे : शहरात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात 94 मिलिमीटर पावसाची नोंद 2011 मध्ये झाली होती. आठ वर्षांनंतर एका रात्रीत 87.3 मिलिमीटर पाऊस पडल्याची घटना पुण्यात घडली. मंगळवारी (ता. 24) सकाळी साडेआठ ते बुधवारी (ता. 25) सकाळी साडेआठ या चोवीस तासांमध्ये हा पाऊस कोसळला. 

पुण्यात या वर्षी 1 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरदरम्यान 326.4 मिलिमीटर पाऊस पडला. त्यापैकी 143.2 मिलिमीटर पाऊस अवघ्या 48 तासांमध्ये पडला. यापूर्वी दहा वर्षांत इतक्‍या कमी वेळेत एवढा पाऊस पडल्याची हवामान खात्यात नोंद झालेली नाही. सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत काळे ढग आकाशात दाटून येतात. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ते गडद काळ्या रंगांचे होऊन विजांचा कडकडाट होऊ लागतो आणि जोरदार पावसाला सुरवात होते, असे चित्र दोन दिवस पुण्यात दिसत आहे, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

का कोसळला भयंकर पाऊस? 
- अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्प येत आहे. 
- पुण्यात हवेतील आद्रतेचे प्रमाण 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. 

सकाळी आणि संध्याकाळी आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपर्यंत किमान तापमानाचा पारा 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. दिवसभर आकाश ढगाळ असले तरीही उन्हाचा चटका जाणवत होता. यापूर्वी काही दिवस 27 ते 28 अंश सेल्सिअस तापमान नोंदले जात होते. त्यामुळे कमाल तापमान तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढले होते. त्याच वेळी हवेतील आद्रतेचे वाढलेले प्रमाण यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले. तसेच, स्थानिक वातावरणाच्या बदलांमुळे हा पाऊस पडला. 
- डॉ. अनुपम कश्‍यपी, हवामान शास्त्रज्ञ, भारतीय हवामान विभाग. 

पुण्यात सप्टेंबरमध्ये पडलेला पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) 
वर्ष ................. पडलेला पाऊस 
2009 ............157.6 
2010 ............ 209.4 
2011 ............ 405.4 
2012 ............ 94.4 
2013 ............ 444.2 
2014 ............ 340 
2015 ............ 347 
2016 ............ 107.4 
2017 ............ 298.8 
2018 ............ 62 
2019 ............ 326.4 

असा पडला पाऊस 
शिवाजीनगर ......... 87.3 
लोहगाव ............. 52.8 
पाषाण ................. 71.8 
चिंचवड ............... 717.1 
वडगावशेरी ........... 434.3 
तळेगाव ................ 181.8 
(स्रोत ः भारतीय हवामान खाते. सर्व आकडे मिलिमीटरमध्ये.) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: record break rain in Pune areas