उंडवडी - कंत्राट मिळविण्यासाठी ठेकेदारांची स्पर्धा वाढू लागली आहे. या कंत्राटदारांच्या स्पर्धेचा प्रत्यय पुणे जिल्हा परिषदेत नुकताच आला. एका कंत्राटदाराने सोनवडी सुपे ( ता. बारामती ) येथील रस्त्याचे काम मिळविण्यासाठी चक्क ७० टक्के कमी दराने टेंडर भरले आहे. विशेष म्हणजे ते टेंडर मंजूर देखील झाले आहे. त्यामुळे आत्ता ३० टक्के रक्कमेत प्रत्यक्षात रस्त्याचे काम दर्जेदार कसे होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.