पुणे - गेल्या आठवड्यापासून शहरात सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसाने मंगळवारी आणि बुधवारी जोरदार हजेरी लावली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरात बुधवारी तब्बल १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे..शहरात २२ मे पर्यंत झालेल्या पावसाने १० वर्षांतील मे महिन्यातील विक्रम मोडला आहे. शहरात यापूर्वी २०१५ मध्ये मे महिन्यात शिवाजीनगर परिसरात १०२.८ मिमी पाऊस झाला होता.मे महिना म्हणजे जणू सूर्याच्या आग्रही उपस्थितीचा काळ. आकाश निरभ्र, वाऱ्याचं अस्तित्व क्षीण आणि उन्हाच्या झळा अंगाला चटके देणाऱ्या. मात्र, यंदा निसर्गाने आपल्या नेहमीच्या रचनेत बदल घडवून आणला आहे..उन्हाळ्याऐवजी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह शहरात पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने या स्थितीला ‘पूर्वमोसमी हवामान बदल’ असे शास्त्रीय नाव दिले असले, तरी त्याचा परिणाम आता थेट सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर जाणवू लागला आहे.एरवी मॉन्सूनपूर्व पाऊस मे महिन्यात तुरळक पडतो. साधारणतः ७ जूनपासून शहरात मॉन्सूनला प्रारंभ होतो. यंदा मात्र, मे महिन्यातील दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यातच दमदार पाऊस झाला आहे. पुढील दोन-तीन दिवसही पाऊस असेल, असे वेधशाळेने म्हटले आहे..ही आहेत कारणे ?1) मॉन्सून केरळमध्ये एरवी जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होता. परंतु, अरबी समुद्राच्या काही भागात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले.2) त्यातून मॉन्सूनला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. त्यातच वाढत असलेला उकाडा हा त्यासाठी पूरक ठरला.3) त्यामुळे यंदा मॉन्सून वेळेपूर्वी येण्याची चिन्हे आहेत.4) उकाडा आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मॉन्सूनपूर्व पाऊसही यंदा वेळेपूर्वी पडत आहे..पावसाचा काय परिणाम झाला?काही भागांत रस्ते तुंबले, घरांत पाणीझाडपडीच्या घटना वाढल्यावाहतूक कोंडी व अपघातांच्या घटनाशाळा व कार्यालयांमध्ये उपस्थितीवर परिणामउकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा.दक्षिण कोकण आणि गोव्यालगत असलेल्या मध्य पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते सध्या स्थिर आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात यंदा मे महिन्यात वाढलेली आर्द्रता, तापमानात झालेली वाढ आणि चक्रीय वाऱ्यांच्या हालचालींमुळे पूर्वमोसमी पावसाची तीव्रता वाढली आहे. परिणामी बुधवारी एनडीए परिसरात झालेला पाऊस हा विक्रमी ठरला.- डॉ. एस. डी. सानप, वैज्ञानिक ‘डी’, हवामानशास्त्र विभाग, पुणे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.