
कात्रज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४ मार्च २०२० रोजी बंद करण्यात आलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय २० मार्च २०२२ रोजी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर उन्हाळी सुटीमुळे प्राणी संग्रहालयात भेट देण्यासाठी लहान मुलांसह अबालवृद्धांची गर्दी होत गेली आणि पहिल्या तिमाहीत विक्रमी उत्पन्न झाले. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात २कोटी ५१लाख १०हजार ९०० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामध्ये तिकीटदरांतून मिळालेले उत्पन्न हे २कोटी ४५लाख ३३हजार २९५ रुपये तर बॅटरीवरील गाडीसाठी आकारण्यात आलेल्या दरातून ५लाख ७७हजार ६०५ रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.
पर्यटकांनी या तीन महिन्यात अभूतपूर्व गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या काळात एकूण ७ लाख १३ हजार ८२४ पर्यटकांनी भेट दिली. यामध्ये २९० परदेशी पर्यटकांनीही भेट दिली आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक असून आतापर्यंत म्हणजेच कोरोनाच्या आधीसुद्धा कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी भेट दिली नसल्याची माहिती प्राणीसंग्रहालय प्रशासनाने दिली आहे. या तीन महिन्याच्या काळात सुटी नसलेल्या दिवशी ४ ते ७ हजार तर सुटीच्या दिवशी २० ते २५ हजारांपर्यंत पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यातून प्राणी संग्रहालयाला दरदिवशी पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
दरम्यान, पर्यटकांची तिकीट खरेदी करण्यासाठी तिकीट खिडकीवर रांग लागलेली दिसत होती. ती रांग तशीच पुढे पादचारी मार्गांवरही येत असल्याचे अनेकवेळा दिसून आले. त्यामुळे प्रशासन ऑनलाईन बुकींग सुरु करणार आहे. मात्र, प्रत्यक्षात ही सेवा कधी सुरु होणार असा प्रश्न पर्यटक उपस्थित करत आहेत. ही सेवा लवकर सुरु झाली तर पर्यटकांना तिकीट खिडकीवर रांग लावावी लागणार नाही आणि पादचारी मार्गांवर होणाऱ्या गर्दीचाही सामना करावा लागणार नाही.
कोरोनानंतर लोक उत्साहात बाहेर पडल्याने ही गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातच प्राणीसंग्रहालय सातत्याने नवनवीन प्राणी आणण्यांवर भर देत आहे. यावर्षी आम्ही रानमांजर, वाघाटी, शेकरु हे तीन नवीन प्राणी आणले आहेत. आता तरसही आणण्यात येणार आहे. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- विलास कानडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
महिना एकूण पर्यटक - एकूण उत्पन्न - बॅटरीवरील गाडीच्या दरातून मिळालेले उत्पन्न
एप्रिल १ लाख ७९हजार २६२ ६२ लाख ४७ हजार १९० - २ लाख २हजार ६७५
मे ३ लाख १८हजार ६४५ १ कोटी ७ लाख ५८ हजार ३६५ - २ लाख ७ हजार ७७५
जून २ लाख १५हजार ९१७- ७५ लाख २७हजार ७४० - १ लाख ६७ हजार १५५
एकूण ७ लाख १३हजार ८२४ २ कोटी ४५ लाख ३३ हजार २९५ - ५ लाख ७७ हजार ६०५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.