Manchar News : मंचर बाजार समितीत कोथिंबिरीला विक्रमी दर; जुडीला ३६ रुपये उच्चांकी भाव, २,५०० जुड्यांतून शेतकऱ्याला ८२ हजारांचा निव्वळ नफा

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी (ता. ७) कोथिंबिरीला चांगला बाजारभाव मिळाला.
Coriander rate increase

Coriander rate increase

sakal

Updated on: 

मंचर - मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी (ता. ७) कोथिंबिरीला चांगला बाजारभाव मिळाला. कोथिंबिरीच्या जुडीला ३६ रुपये उच्चांकी भाव, तर काही शेतकऱ्यांना ३५ रुपये ५० पैसे दर मिळाला. चांडोली खुर्द येथील शेतकरी दत्तात्रय रंगू इंदोरे यांच्या २,५०० जुड्यांना तब्बल ८८ हजार रुपये मिळाले. खते औषधे मजुरीउत्पादन खर्च वजा जाता केवळ ४० दिवसांत ८२ हजार रुपये निव्वळ नफा मिळाल्याने इंदोरे यांनी समाधान व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com