Property Registration Pune : दस्तनोंदणीची तिमाहीतच भरारी; महसुलात तब्बल दोनशे कोटींनी वाढ
Urban Development : यंदाच्या पहिल्या तिमाहीत दस्तनोंदणीत ५० हजारांनी वाढ झाली असून राज्याच्या महसुलात २०० कोटींची भर पडली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील रेडी रेकनर दरवाढीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला आहे.
पुणे : बांधकाम क्षेत्राला गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगले दिवस आले आहेत. मागील आर्थिक वर्षात (२०२४-२५) पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत तब्बल पन्नास हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महसुलात तब्बल २०० कोटींनी वाढ झाली.