Abhay Yojana
sakal
चाकण - नगर परिषदेच्या वतीने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष कर वसुली मोहिमेला, महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांनी जाहीर केलेल्या ‘अभय योजनेला’ चाकणमधील मिळकतधारकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. नगर परिषदेने केलेल्या आवाहनाला दाद देत नागरिकांनी आपला थकीत व चालू कर व शास्ती भरण्यास प्राधान्य दिले असून, ३१ मार्च २०२६ पर्यंत शहरात सुमारे नऊ कोटी ८३ लाख रुपयांची विक्रमी मालमत्ता कर वसुली झाली आहे.