

First Record of Red Crested Pochard in Junnar
Sakal
पिंपळवंडी : जुन्नर तालुक्यात प्रथमच रेड क्रेस्टेड पोचार्ड (Red-crested Pochard – Netta rufina) या दुर्मीळ स्थलांतरित पाणपक्ष्याची नोंद झाली असून, ही घटना परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. हा पक्षी यापूर्वी जुन्नर तालुक्यात नोंदविला गेला नव्हता. या दुर्मीळ पक्ष्याचे प्रथम निरीक्षण व छायाचित्रण पक्षी निरीक्षक विजय वायळ आणि रवी हांडे यांनी केले असून, त्यांच्या नोंदीमुळे या पक्ष्याची अधिकृत नोंद झाली आहे. त्यामुळे जुन्नर तालुका पक्षी निरीक्षणाच्या नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित झाला आहे.