

लाल भोपळा पराठे
------------------
साहित्य ः लाल भोपळा अर्धा किलो, बेसन एक वाटी, गहू पीठ तीन वाट्या, दही तीन मोठे चमचे, पाच-सहा हिरव्या मिरच्या, कोथिंबीर मूठभर, तिखट, काळी मिरी पूड प्रत्येकी एक चमचा, हळद अर्धा चमचा, ओवा एक लहान चमचा, मीठ, तेल गरजेनुसार.
कृती ः लाल भोपळा कुकरमध्ये एक शिटी काढून घ्या. हा भोपळा किसून घ्या. परातीत बेसन, कणीक, किसलेला भोपळा, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, काळी मिरी पूड, ओवा, मीठ, दही हे सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळून घ्या. मळलेले पीठ थोडे तेल लावून बाजूला मुरायला ठेवा. दहा मिनिटांनंतर या पिठाचे छोटे गोळे घेऊन त्याचा पराठा लाटून घ्या. तव्यावर तेल लावून भाजून घ्या. लाल भोपळा पराठा लोणचे, चटणीसोबत छान लागतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.