

Devotees prepare for the annual Kartik Palkhi procession from Reda Sanjeevan Samadhi Temple in Aale to Alandi.
esakal
राजेश कणसे
आळेफाटा, : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविलेल्या आळे (ता. जुन्नर) येथील श्री क्षेत्र रेडा संजीवन समाधी मंदिरातून आळंदी येथे जाणाऱ्या कार्तिक पायी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान रविवार (ता. २९) रोजी होणार आहे. या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, वारकरी व भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.