Pune News : पुणे जिल्ह्यातील ९ हजार कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ; जिल्हा परिषदेने १०८४ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

EPF and Pension Scheme : पुणे जिल्ह्यातील ९,०१५ अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी व पेन्शन लागू करण्याचा ऐतिहासिक निकाल ईपीएफओने दिला असून, जिल्हा परिषदेला १०८४ कोटी रुपये ६० दिवसांत जमा करण्याचे आदेश दिल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
EPF and Pension Scheme

EPF and Pension Scheme

esakal

Updated on

पुणे : अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका आदी विविध नावांनी सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या सुमारे ९,०१५ कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी दिला आहे. या निर्णयानुसार, पुणे जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांचे आणि नियुक्त्याचे योगदान मिळून जवळपास १०८४ कोटी १३ लाख रुपये येत्या ६० दिवसांत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com