Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाबाबत पुण्यात रेखा कोंडे, ललिता तारक व इतर महिलांनी घेतलेल्‍या संयुक्त पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांच्‍याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
rekha konde and manoj jarange patil

rekha konde and manoj jarange patil

sakal

Updated on: 

पुणे - ‘मराठा आरक्षणाचा प्रश्‍न हा गेल्‍या ४० वर्षांपासून धगधगत आहे. मात्र, आंतरवाली सराटी येथे झालेल्‍या आंदोलनातून मनोज जरांगेसारखे अडाणी नेतृत्‍व समोर आले. त्‍याला मराठा समाजाने डोळे झाकून पाठिंबा दिला. मात्र गेल्‍या तीन वर्षांत या आंदोलनाचे नेमके फलित काय हा प्रश्‍न अजूनही कायम आहे. त्‍याबाबत जरांगे यांना प्रश्‍न विचारला असता त्‍यांच्‍या पाच हजार कार्यकत्‍यांनी समाजमाध्‍यमांवर माझ्या पोस्‍टवर ट्रोलिंग, अश्‍लील कमेंट केल्‍या असून महिला कार्यकत्‍यांचा अपमान केला आहे’. असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक रेखा कोंडे यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com