Ahilyadevi Holkar loan waiver scheme benefits
esakal
पुणे - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्य सरकारने पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी शुक्रवारी (ता. ११) जाहीर केली. यात राज्यातील तीन लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच कर्जमुक्तीची रक्कम थेट त्यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात येणार आहे.