Water Shortage : पुणेकरांना उन्हाळ्यात दिलासा! शहरात ३१ मे पर्यंत तरी पाणी कपात नाही

मुंबई महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर पुणे महापालिका पाणी कपातीबाबत नेमका काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
Pune water shortage

Pune water shortage

sakal

Updated on

पुणे - मुंबई महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर पुणे महापालिका पाणी कपातीबाबत नेमका काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर ३१ मे पर्यंत तरी पुणे शहरात पाणी कपात करण्यात येणार नसल्याचा निर्णय महापौर मंजूषा नागपुरे यांनी मंगळवारी घेतला. त्यामुळे पुणेकरांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. मे महिन्यानंतर धरणातील उपलब्ध पाणीसाठा व हवामान खात्याचा अंदाज याचा विचार करून पुढील निर्णय महापालिका घेणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com