

Water Supply
ESakal
पुणे - पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये बांधकाम प्रकल्पांना परवानगी देताना पाणीपुरवठ्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी महापालिकेने सुधारित धोरण लागू केले आहे. त्यानुसार, महापालिकेकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत संबंधित विकसकाला स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. बांधकाम परवानगीच्या प्रस्तावासोबत विकसकाला सुधारित हमीपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.