Pune News : सांगवी करांना दिलासा,मुळा नदीपात्रातील जलपर्णी हटवली

डास किटकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होवून नागरिकांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते
Mula river basin
Mula river basinsakal

जुनी सांगवी : सांगवी परिसरातील मुळा नदी पात्र जलपर्णीमुळे हिरव्यागार शेतासारखे भासू लागले होते.यामुळे डास किटकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होवून नागरिकांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.याबाबत नागरिकांमधून जलपर्णी हटविण्याची मागणी होत होती.याबाबत शुक्रवार ता.१७ सकाळ मधून सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

जलपर्णीमुळे मुळा नदी किनारा परिसरातील मधुबन सोसायटी परिसर,शितोळे नगर,मुळा नगर, ढोरे नगर , पवार नगर,पवना नगर , संगमनगर आदी भागातील नदी किनारा रहिवासी भागांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. बातमीची दखल घेत पालिका प्रशासनाकडून मधुबन सोसायटी भागातील मुळानदीपात्रातील जलपर्णी काढण्यात आल्याने डास किटकांचा उपद्रव कमी होणार असल्याने सांगवी करांना दिलासा मिळाला आहे.

Mula river basin
Gudi Padwa : नाकी नथ अन् केसांत गजरा असा करा गुढी पाडव्याचा खास साज

मुळानदीकाठावरिल मधुबन येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात डासांच्या त्रासामुळे नागरिक जाण्यास धजावत नव्हते.जलपर्णी हटविल्यानंतर मुळानदीपात्र मोकळे दिसू लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com