महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचा मजुरांना दिलासा

सनील गाडेकर
मंगळवार, 14 जानेवारी 2020

 बांधकाम मजूर व त्यांच्या कुटुंबांसाठी असलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या कामगारांची संख्या राज्यात दुपटीने वाढली आहे.

पुणे - बांधकाम मजूर व त्यांच्या कुटुंबांसाठी असलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या कामगारांची संख्या राज्यात दुपटीने वाढली आहे. दरम्यान, आजही शेकडो कामगारांचे अर्ज नोंदणीच्या प्रतीक्षेत असून, या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करून जास्तीत जास्त कामगारांना योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंडळाच्या वतीने कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा, आरोग्य,  शिक्षण आणि आर्थिक स्वरूपाच्या योजना राबविण्यात येतात. मात्र, त्यासाठी कामगारांची कामगार आयुक्तालय किंवा संबंधित कार्यालयात नोंदणी आवश्‍यक  आहे. उपकर, कामगार नोंदणी, नोंदणीचे वार्षिक नूतनीकरण आणि या सर्वांवरील व्याज या माध्यमांतून महामंडळाकडे निधी जमा होतो. लाभार्थी कामगारांची संख्या वाढली असली, तरी नोंदणी करण्यात आणि मंडळाच्या सेवा घेण्यात येणाऱ्या अडचणी कमी झालेल्या नाहीत.

लाभार्थ्यांमध्ये दोन किंवा त्याहून अधिक योजनांचा फायदा घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या वर्षी निवडणुकांमुळे नोंदणीचे प्रमाण कमी झाले. आता ऑनलाइनदेखील नोंदणी करण्यात येते. गरजू व योग्य प्रकारे अर्ज केलेल्या कामगारांना त्वरित लाभ देण्यात येत आहे. 
- एस. सी. श्रीरंगम, सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी, महामंडळ

यासाठी मिळते अर्थसाह्य
 आजारपण
 मुलांचे शिक्षण    
 घरबांधणी    
 लग्न
 अवजारे घेण्यासाठी    
 मृत्यूपश्‍चात मदत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief to the workers of Maharashtra Building and other construction workers

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: