
यवत/ केडगाव : ‘‘यवतमधील धार्मिक प्रतिमांची विटंबना ही सहज घटना नाही, तर ते एक ठरवून केलेले षड््यंत्र आहे. ही विटंबना नाही तर धर्मावर आघात आहे. एवढी मस्ती कुठून आली? आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे, म्हणजे पुन्हा कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यास फाशीची शिक्षा दिली पाहिजे,’’ असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले.