esakal | महावितरणच्या वडगाव उपविभागीय कार्यालयाचे स्थलांतर IPune
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणच्या वडगाव उपविभागीय कार्यालयाचे स्थलांतर

महावितरणच्या वडगाव उपविभागीय कार्यालयाचे स्थलांतर

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: महावितरणच्या सिंहगड रस्त्यावरील अभिरुची पोलीस चौकी समोर असलेल्या वडगाव उपविभागीय कार्यालयाचे धायरी फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या मधुकोश सोसायटी जवळील महावितरणच्या मालकीच्या प्रशस्त इमारतीत स्थलांतर होणार आहे. दि. 1 ऑक्टोबर पासून या नवीन इमारतीत कामकाजाला सुरुवात होणार असल्याची माहिती वडगाव उपविभागीय कार्यालयाचे अतिरिक्त अभियंता कल्याण गिरी यांनी दिली.

महावितरणच्या वडगाव उपविभागीय कार्यालयांतर्गत सिंहगड रस्ता परिसरातील खडकवासला, किरकटवाडी, नांदेड, धायरी, नऱ्हे, वडगाव व हिंगणे खुर्द या गावांचा समावेश आहे. या उपविभागात महावितरणचे एक लाख बासष्ट हजार ग्राहक आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या नागरिकरणामुळे नवीन वीज ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

हेही वाचा: राज ठाकरे यांच्या ई-मेलला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर

महावितरणचे अभिरुची पोलीस चौकी समोर असलेले कार्यालय हे 2011पासून भाडे तत्वावर घेतलेल्या जागेत होते. तसेच दैनंदिन कार्यालयीन कामकाजासाठी ही जागा अपुरी पडू लागली होती. त्यामुळे मधुकोश सोसायटी जवळील महावितरणच्या जागेत प्रशस्त कार्यालय उभारण्यात आले असून सहाय्यक अभियंता कार्यालय व अतिरिक्त अभियंता कार्यालय आता एकाच जागी येत असल्याने वीज ग्राहकांसाठी सोईचे होणार आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणेही सोपे होणार असून वीज ग्राहकांना चांगली सेवा देता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी नवीन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अतिरिक्त अभियंता कल्याण गिरी यांनी केले आहे.

loading image
go to top