केडगाव - आमच्या आयुष्यातील १९ मे १९७५ हा काळाकुट्ट दिवस. मे महिना आला की आम्ही अजूनही बेचैन होतो. काळाने झडप घालणे काय असते ते आम्ही याची देही याची डोळा पाहिले. आमच्या लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक जनता एक्सप्रेसने गार (ता.दौंड) हद्दीत उडविला अन् त्यात ६० वऱ्हाडी ठार तर १७ जण जखमी झाले होते.