

हिर्डोशी, ता. ९ : भोर तालुक्यातील हिरडस मावळात भात पिकाखालोखाल बांबूची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु, शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेली पाच एकरपेक्षा कमी क्षेत्राची असलेल्या अटीमुळे शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळे ही पाच एकरची अट रद्द करावी, अशी मागणी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याकडे हिरडस मावळातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत मंत्री गोगावले यांना रविवारी (ता. ८) आपटी (ता. भोर) येथे शेतकऱ्यांनी निवेदन दिले.
तालुक्यातील पश्चिम भागात असलेले हिरडस मावळ खोरे हे दुर्गम व डोंगरी भागात येते. येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनीचे सामाईक क्षेत्र आहे. त्यामुळे शासकीय योजना घेताना शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत ही क्षेत्राची अट रद्द करावी, तसेच बांबू लागवड ही भाऊसाहेब फुंडकर या योजनेतून करण्यास मान्यता द्यावी. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन मिळून बांबू लागवडीसाठी शासनाचा लाभ घेता येईल, अशी मागणी मंत्री गोगावले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी बाबाजी साळेकर, दिनेश शिंदे, विष्णू पारठे, धोंडिबा राऊत, नेताजी साळेकर, शरद दिघे, सचिन कंक, सचिन खाटपे, संजय मळेकर आदी हिरडस मावळातील शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.