

बारामती, ता. ११ : महावितरणच्या उच्चदाब व लघुदाब विद्युत वाहिन्यांच्या खांबांवर विविध केबल ऑपरेटर, इंटरनेट सेवा प्रदाते तसेच ऑप्टिकल फायबर सेवा प्रदात्यांकडून अनधिकृतपणे टाकलेल्या केबल्स व वायर्स तातडीने हटवाव्यात, असे आवाहन महावितरणच्या बारामती परिमंडळाने केले आहे. संबंधितांनी या केबल्स स्वखर्चाने काढून घ्याव्यात, अन्यथा लागू कायदे व नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणतर्फे देण्यात आला आहे.
विद्युत खांबांवर अनधिकृत केबल्स टाकल्यामुळे खांबांवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. तसेच केबल तुटणे, झुकणे किंवा लोंबकळल्याने पादचारी, वाहनचालक, नागरिक तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. विशेषतः विद्युत वाहिन्यांच्या जवळ केबल्स आल्यास गंभीर विद्युत अपघाताचा धोका संभवतो.
देखभाल-दुरुस्तीच्या कामात अडथळा
महावितरणची विद्युत यंत्रणा ही अत्यावश्यक सार्वजनिक सेवा आहे. त्यामुळे नियमित देखभाल, दुरुस्ती आणि आपत्कालीन बिघाड निवारणाची कामे तातडीने करावी लागतात. मात्र, विद्युत खांबांवर अनधिकृतपणे बांधलेल्या केबल्समुळे कर्मचाऱ्यांना काम करताना अडथळा निर्माण होतो. परिणामी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामास विलंब होण्याची शक्यता आहे, असे महावितरणने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.