

मोरगाव, ता. २० : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद सदस्या रोहिणी कदम-ढोले यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून हा सोहळा पार पडला.
यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्या पल्लवी खैरे, पंचायत समिती सदस्या उज्ज्वला खैरे, अभियंता सुहास लडकत, उपसरपंच केदार वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे आदी उपस्थित होते.
नूतनीकरण केलेल्या आरोग्य केंद्रामध्ये सुसज्ज उपचार कक्ष, प्रतीक्षा कक्ष आणि औषध वितरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.