पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (तत्कालीन पुणे विद्यापीठ) माजी प्र-कुलगुरू आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शंकर नागेश नवलगुंदकर (वय- ८९) यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी ( ता. ६) सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.