Baramati News : 25 पाझर तलावांची दुरुस्ती केल्यास टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होईल...

बारामती तालुक्यात इंग्रजांच्या काळापासून अनेक पाझर तलाव बांधले गेले.
Percolation Tanks
Percolation Tankssakal
Updated on

बारामती - टंचाईवर मात करण्यासाठी बारामती तालुक्यातील पाझर तलावांची दुरुस्ती केल्यास काही प्रमाणात तरी विहीरींच्य पाण्याची पातळी वाढून त्याचा जिरायत क्षेत्राला लाभ होईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

बारामती तालुक्यात इंग्रजांच्या काळापासून अनेक पाझर तलाव बांधले गेले. या पैकी काही तलाव सुस्थितीत आहे तर काही तलावात गाळ साचून साठवण क्षमता कमी झाली आहे. लोकसहभाग व शासकीय खर्चाने या तलावांची डागडुजी पुढील दोन महिन्यात करावी, अशी लोकांचीही मागणी आहे.

बारामती तालुक्यात मुर्टी, पळशी, मासाळवाडी, मोढवे, लोणीभापकर, जोगवडी, देऊळगाव रसाळ, नारोळी, कोळोली, सुपा, बाबुर्डी, गोजुबावी, साबळेवाडी, शिर्सुफळ व चांदगुडेवाडी येथील तलावात जवळपास 61 हजार घनमीटर गाळ साचून आहे. हा गाळ काढल्यास या तलावांची पाणीसाठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. शिवाय हा गाळ आसपासच्या शेतक-यांना दिल्यास जमिनीची सुपिकता वाढण्यासही मदत होईल.

या व्यतिरिक्त उपसा सिंचन आवर्तनाद्वारे भरण्यात येणारे तलाव व दुरुस्ती गरजेची असलेल्या चांदगुडेवाडी, मांगोबाची वाडी, सुपा खंडूखैरेवाडी, कोळोली, नारोळी ढमेवस्ती, आंबी खुर्द, साबळेवाडी-गाडेकरवस्ती, सोनवडी सुपे, तरडोली व शिर्सुफळ येथील तलावांमध्ये 29.80 दशलक्ष घनफूट इतकी पाणीसाठवण क्षमता आहे. दुरुस्ती व खोलीकरणानंतर या तलावांचीही क्षमता वाढून त्याचा आसपासच्या परिसाला मोठा लाभ होऊ शकतो.

वर नमूद केलेल्या 25 पाझर तलावांच्या दुरुस्ती, खोलीकरणाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतल्यास तालुक्यात पावसाळयात जे मोठे पाऊस होतात त्या पावसाचे पाणी या तलावात साठून बाजूच्या विहीरींच्या पाण्याची पातळी वाढण्यासह शेतक-यांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, असे चित्र आहे.

पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करु....

पाझर तलावांच्या दुरुस्तीमुळे तसेच गाळ काढल्यामुळे खोली वाढून पाणी साठवण क्षमता वाढू शकते हे उघड आहे. ही संकल्पना चांगली असून यावर आराखडा तयार करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करु- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद.

स्वागतार्ह संकल्पना

दरम्यान पाझर तलावांची दुरुस्ती व गाळ काढणे ही संकल्पना स्वागतार्ह असून या बाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा करुन यात कशा पध्दतीने काम करणे शक्य होईल, याची चर्चा केली जाईल.- अनिल बागल, गटविकास अधिकारी, बारामती पंचायत समिती.

गाळ काढल्याने भूगर्भातील पाणीपातळी वाढेल....

या बाबत सर्वेक्षण करुन आवश्यक त्या तलावातील गाळ काढला व खोलीकरण केल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होईल. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या संकल्पनेनुसार तलावातील गाळ काढल्यास त्याचा निश्चित फायदा शेतक-यांना होईल.

- दिलीप खैरे, ग्रामस्थ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com