Sewage truck hits a pothole
sakal
पुणे - सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला (एसटीपी) जोडणाऱ्या मोठ्या व्यासाच्या मलवाहिन्यांच्या (ट्रंक लाईन) देखभाल-दुरुस्तीसाठी मलनिःसारण विभागाने वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत गेल्या वर्षी तब्बल ६७ लाख रुपये खर्च केले आहेत. तरीही एरंडवणे एसटीपीच्या शेजारीच असलेल्या ट्रंक लाईनला भगदाड पडले असून, गेल्या अनेक महिन्यांपासून रोज हजारो लिटर मैलापाणी थेट मुठा नदीत जात आहे.