सहायक अभियंत्यांची महावितरणकडून बदली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

धायरी येथील वादग्रस्त कारभाराची महावितरणने दखल घेत तेथील सहायक अभियंत्यांची बदली मुळशीमध्ये करण्यात आली. मात्र, नियम धाब्यावर बसून धायरी परिसरात झालेल्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

पुणे - धायरी येथील वादग्रस्त कारभाराची महावितरणने दखल घेत तेथील सहायक अभियंत्यांची बदली मुळशीमध्ये करण्यात आली. मात्र, नियम धाब्यावर बसून धायरी परिसरात झालेल्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रान्सफार्मरवर क्षमतेपेक्षा जास्त वीजलोड देणे, वीजजोड देण्यात घोळ, पैसे भरूनही वीजजोड देण्यास टाळाटाळ, सोसायट्यांचे वीजमीटर काढून नेणे इत्यादी नियमबाह्य प्रकार धायरी येथील महावितरणच्या कार्यालयातून होत होते. 

याविषयी ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. तसेच, नागरिकांनी महावितरणकडे तक्रारी केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर महावितरणने धायरी येथील सहायक अभियंता दीपक बाबर यांची मुळशी तालुक्‍यात बदली केल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी भारत जाधव यांनी दिली. 

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महावितरणने एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. ही चौकशी पूर्ण झाल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला होता. मात्र, त्याबाबतचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Replacement of Assistant Engineer by General Manager