कास - अवैध शिकारी कळवा आणि रोख बक्षीस मिळवा....

कास - अवैध शिकारी कळवा आणि रोख बक्षीस मिळवा....

Published on

अवैध शिकारी कळवा अन्‌ रोख बक्षीस मिळवा

रोहोट परिमंडळात वनपाल राजाराम काशीद यांचा उपक्रम

कास, ता. २५ : दुर्गम कास परिसरातील रोहोट परिमंडळमधील नियतक्षेत्र रोहोट, खडगाव, धावलीमधील सर्व गावांत शिकारमुक्त अभियान राबवले जात असून, अवैध शिकारी कळवा आणि रोख बक्षीस मिळवा, असा उपक्रम या परिमंडळाचे वनपाल राजाराम काशीद यांनी राबवला आहे.
वन परिमंडळ रोहोटचे वनपाल राजाराम काशीद यांनी आवाहन केले आहे, की आपल्या परिसरात शिकार होत असलेस, तसेच जंगल क्षेत्रात आग लावून वनसंपदेचे नुकसान करणे, वन क्षेत्रात विना परवाना अतिक्रमण करणे, मानव व वन्यजीव संघर्ष अशा बाबी निदर्शनास आल्यास नजीकच्या वनरक्षक, वनपाल यांना तत्काळ कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, तसेच त्यास योग्य बक्षीस दिले जाईल. एक जबाबदार नागरिक म्हणून वनांचे संरक्षण करणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. शासनामार्फत पीक नुकसान, पशुधन हानी, मनुष्य हानी यामध्ये नुकसान भरपाई दिली जात असून, जंगलापासून आवश्यक प्राण वायू, पर्जन्यमान, मृद संधारण अशा महत्त्वाच्या गोष्टी मिळत असून, पुढील पिढीसाठी प्रत्येकाने एक झाड लावणे खूप आवश्यक आहे.

चौकट
ही शिक्षा होऊ शकते
अवैध शिकार घडल्यास प्रकरणातील आरोपीस तीन ते सात वर्षे शिक्षा, २५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अवैध वृक्षतोड करताना कोणी निदर्शनास आल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन वनपाल रोहोट यांनी केले आहे.


चौकट
पर्यटन स्थळांच्या
विकासासाठी प्रयत्न
वनपाल राजाराम काशीद हे कास पठार, भांबवली धबधबा या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर राहून काम करत असतात. त्यांनी निसर्गावर पुस्तके लिहिली आहेत. उत्कृष्ट कामगिरीबद्दल २६ जानेवारीला त्यांचा वरिष्ठांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.

कोट
रोहोट परिमंडळमध्ये शिकारीस आळा बसण्यासाठी पोलिस विभागाप्रमाणे गोपनीय खबऱ्यांचे जाळे तयार केले असून, शिकारीस आळा घालण्यासाठी रात्रगस्त सुरू आहे.
- राजाराम काशीद, वनपाल, रोहोट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com