भोरमध्ये महाराष्ट्र गीताचे गायन
भोर, ता. २७ : येथील तहसील कार्यालयासमोरील राजवाडा चौकात प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी (ता. २६) सकाळी झालेल्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमांस तालुक्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह, विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक आदींसह देशप्रेमींनी गर्दी केली. भोरचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) डॉ. विकास खरात यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे, तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, निवासी नायब तहसीलदार अरुण कदम, महसूल नायब तहसीलदार वैशाली घोरपडे, निवडणूक नायब तहसीलदार आदेश दुनाखे, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार प्रतिभा खाडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रितम गायकवाड, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार, नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, उपनगराध्यक्षा अॅड जयश्री शिंदे, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे तालुका निरीक्षक हेमंत निगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजसाहेब आगळे आदी उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक दिप्ती करपे यांनी पोलिस, गृहरक्षक दल, माजी सैनिक आदींसमवेत राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. राजा रघुनाथराव विद्यालयातील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताचे गायन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

