Pune News : मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत प्रजासत्ताकदिनी ध्वज वंदन होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Flag
पुणे : मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत प्रजासत्ताकदिनी ध्वज वंदन होणार

पुणे : मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत प्रजासत्ताकदिनी ध्वज वंदन होणार

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या प्रजासत्ताक दिनी (ता. २६ जानेवारी) मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याचा ध्वज वंदनाचा मुख्य समारंभ आयोजित केला जाणार आहे. यावेळी सकाळी ९.१५ वाजता ध्वज वंदन केले जाणार आहे. शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत, प्रजासत्ताकदिन साजरा करावा, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणामध्ये फसवणुक करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जिल्ह्याच्या मुख्य शासकीय समारंभात मर्यादित निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी प्रजासत्ताकदिनी सकाळी ८.३० वाजल्यापासून १० वाजेपर्यंत ध्वज वंदनाचे अन्य कोणतेही कार्यक्रम किंवा अन्य कोणताही सरकारी किंवा निमसरकारी कार्यक्रम आयोजित करू नये. सरकारी कार्यालये किंवा खासगी संस्थांना ध्वज वंदन करावयाचे असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० वाजण्यापूर्वी आणि १० वाजल्यानंतर करावा, असा आदेशही डॉ. देशमुख यांनी दिला आहे.

हेही वाचा: 'मला आठवत नाही', चांदीवाल आयोगाच्या उलट तपासणीत देशमुखांनी प्रश्न टाळला?

स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील आणि कोरोनायोद्धा जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही मर्यादित नागरिकांनाच मुख शासकीय समारंभास निमंत्रित करण्यात येणार आहे.

प्रजासत्ताकदिनी हे करता येईल

  • दिवसभर कधीही वृक्षारोपण

  • शाळा आणि महाविद्यालये पातळीवर ऑनलाइन वाद-विवाद स्पर्धा

  • प्रश्नमंजूषा, देशभक्तिपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन

  • महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ

  • सामाजिक माध्यमांद्वारे निवडक विद्यार्थी विद्यार्थिनींचे देशभक्तिपर गीते, भाषणे आयोजन

  • प्रजासत्ताकदिनी हे करू नये

  • शाळा, महाविद्यालयांनी प्रभात फेऱ्या काढू नयेत

  • सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये

  • विविध खेळांचे आयोजन करू नये

Web Title: Republic Day Celebrate Presence Of Limited Number Of Citizens

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top