पुणे : रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. डी. शेवाळे यांचे निधन

दलित चळवळीत सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ ते सक्रिय होते.
Republican Party leader M D Shewale passed away
Republican Party leader M D Shewale passed away sakal
Updated on

पुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) ज्येष्ठ नेते व पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार मधुकर धर्माजी उर्फ एम. डी. शेवाळे (वय ७८) यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. दलित चळवळीत सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ ते सक्रिय होते. शेवाळे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे. शेवाळे यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता कॅंप परिसरातील धोबीघाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Republican Party leader M D Shewale passed away)

तत्पूर्वी नाना पेठेतील आंबेडकर कॉलेजजवळील महात्मा फुले शाळेजवळून त्यांच्या अंत्ययात्रेस प्रारंभ होईल. शेवाळे मूळचे पुण्यातील. कॅंप परिसरातील भीमापुरा येथे ते राहत. ‘दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ या शिक्षण संस्‍थेचे ते सेक्रेटरी होते. सुमारे ४० वर्षांपासून ते या संस्थेत सक्रिय होते. शेवाळे यांनी सुरवातीच्या काळात दलित उद्धारक पक्षाची स्थापना केली. नंतर त्यांनी दलित टायगर हा पक्षही स्थापन केला. गेल्या ३० वर्षांपासून ते रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याबरोबर काम करीत होते. राज्यभर त्यांचा संचार असे. काही वर्षांपूर्वी त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढविली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com