गरज लक्षात घेऊन संशोधन करावे : नितीन गडकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Research done keeping mind need Inauguration startups backed Science Technology Park Nitin Gadkari
गरज लक्षात घेऊन संशोधन करावे : नितीन गडकरी

गरज लक्षात घेऊन संशोधन करावे : नितीन गडकरी

पुणे : ‘‘देशातील भविष्याची गरज काय आहे, आपण काय आयात करतोय आणि काय निर्यात करू शकतो याची आपण जनजागृती करायला हवी. त्यानंतर आपली गरज लक्षात घेऊन संशोधन करावे. संशोधन करीत असताना आपली बलस्थाने आणि कमतरता लक्षात घेतली पाहिजे. तरच आपण आत्मनिर्भर होवू शकतो,’’असा विश्‍वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. ६) व्यक्त केले.

‘सायन्स टेक्नॉलॉजी पार्क’चे पाठबळ असलेल्या पाच स्टार्टअप्सचे गडकरी यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सल्लागार डॉ. अनिता गुप्ता, अध्यक्ष दिलीप बंड, पार्कचे उपाध्यक्ष आणि ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि पार्कचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे यावेळी उपस्थित होते.

गुप्ता म्हणाल्या, ‘‘ स्टार्टअप हे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने गेम चेंजर असून पार्क नेहमीच स्टार्टअपला मदत करीत आहे. स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून स्टार्टअपला आवश्यक असलेले वातावरण देशात निर्माण झाले आहे. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल देखील होत आहेत. केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या ‘निधी’आणि ‘प्रयास’या दोन उपक्रमांचा स्टार्टअपला फायदा होत आहे.’’

पवार म्हणाले, ‘‘पुण्यात स्टार्टअपसाठी चांगले वातावरण आहे. पण आजही आपण नावीन्याच्या बाबतीत बंगळूर आणि चेन्नर्इच्या मागे आहोत. एक चांगला निर्णय हजारो जणांना नोकरी देवू शकतो. त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होवू शकते, याचे एक चांगले उदाहरण म्हणजे हिंजवडी आयटी पार्क. पुण्याच्या विकासाला गडकरी यांचा नियमित पाठिंबा राहिला आहे. वाढत असलेल्या पुण्याचा विचार करता येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ गरजेचे आहे.’’पुण्यात नवीन विमानतळ व्हावे यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती यावेळी पवार यांनी गडकरी यांना केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जगदाळे यांनी केले. पार्कच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. आभार बंड यांनी मानले. सूत्रसंचालन जगदीश पाटणकर यांनी केले.

पुणे ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंग हब व्हावे : गडकरी

‘‘सिद्ध झालेले तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार्यता, कच्चा मालाची उपलब्धता आणि विक्री योग्यता या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या चार गोष्टी अमलात आणल्यास ऑटोमोबार्इलसह सर्वच क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत. पुणे ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंग हब व्हायला हवे. या क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा साडेसात लाख कोटी रुपयांचा आहे. पुढील पाच वर्षात या इंडस्ट्रीचा वाटा १५ लाख कोटी करायचा आहे. या क्षेत्राने आतापर्यंत चार कोटी रोजगार दिले आहेत. आगामी काळात आणखी एक कोटी रोजगार उपलब्ध होणार आहे,’’अशी माहिती गडकरी यांनी दिली. पायाभूत सुविधा नसल्याचा फटका मला देखील बसला आहे. त्यामुळे कोणताही प्रयोग करताना त्यासाठी आवश्‍यक बाबींचा देखील विचार करावा, असा सल्ला त्यांनी स्टार्टअपला दिला.

या पाच स्टार्टअपचे उद्घाटन :

  • ग्रिनज्यूल्स

  • जी.डी.एन्व्हार्यमेंटल

  • पिक्झी इलेक्ट्रीकल्स कार्स

  • अश्‍नी

  • रोबारोटीक्स ॲगटेक

जे.डब्लू. मेरीयट, एस. बी.रस्ता : ‘सायन्स टेक्नॉलॉजी पार्क’चे पाठबळ असलेल्या पाच स्टार्टअप्सचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. राजेंद्र जगदाळे, डॉ. अनिता गुप्ता, गडकरी, प्रतापराव पवार, दिलीप बंड.

Web Title: Research Done Keeping Mind Need Inauguration Startups Backed Science Technology Park Nitin Gadkari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top