पुण्यातील संशोधकांकडून दुर्मीळ रेडिओ लहरींचा शोध; रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मार्च 2019

पुणे : आकाशगगांच्या अभ्यासासाठी रेडिओ लहरींचा उपयोग केला जातो. आजपर्यंत एका विशिष्ट तीव्रतेच्या वरील रेडिओ लहरी ब्रह्मांडाच्या पसाऱ्यातून कधीच प्राप्त झाल्या नाहीत. परंतु, पुण्यातील संशोधकांनी "जीएमआरटी' या रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने दुर्मीळ रेडिओ लहरींचा शोध घेतला आहे. 

पुणे : आकाशगगांच्या अभ्यासासाठी रेडिओ लहरींचा उपयोग केला जातो. आजपर्यंत एका विशिष्ट तीव्रतेच्या वरील रेडिओ लहरी ब्रह्मांडाच्या पसाऱ्यातून कधीच प्राप्त झाल्या नाहीत. परंतु, पुण्यातील संशोधकांनी "जीएमआरटी' या रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने दुर्मीळ रेडिओ लहरींचा शोध घेतला आहे. 

या संबंधीचा शोधनिबंध लंडन येथील प्रतिष्ठित "रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी'च्या नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झाला. या रेडिओ लहरींचे नामकरण "एक्‍स्ट्रीमली इन्व्हर्टेड स्पेक्‍ट्रम एक्‍स्ट्रागॅलेक्‍टीक रेडिओ सोर्स'(आयजर) असे करण्यात आले आहे. राष्ट्रीय रेडिओ खगोलविज्ञान केंद्र, आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्र (आयुका), आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील संशोधकांचा यात सहभाग आहे.
 
या दुर्मीळ रेडिओ लहरी आकाशगंगांमधून प्राप्त होतील का? याबद्दल शंकाच होती. पण, जीएमआरटीच्या साहाय्याने आम्हाला हे शक्‍य झाले आहे. यामुळे भविष्यातील अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात नवीन आयाम जोडले जातील, असे मत या संशोधनात महत्त्वपूर्ण सहभाग असलेले खगोलशास्त्रज्ञ डॉ. सुरजित पॉल यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ""या संशोधनामुळे ब्रह्मांडातील विविध ग्रह, तारे, आकाशगंगा यांच्या संशोधनासाठी वेगळी प्रणाली उपलब्ध होईल. आकाशगंगांच्या भौतिक प्रक्रियांबद्दल नवीन माहिती जगासमोर येण्यास मदत होईल.'' काही वर्षांपूर्वी प्रा. डॉ. गोपाल कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली रेडिओ लहरींच्या रचनात्मक संशोधनाला सुरवात झाली होती. सध्याच्या शास्त्रज्ञांच्या चमूमध्ये विद्यापीठाच्या मुकुल म्हस्के, समीर साळुंखे, आयुकाचे प्रतीक दाभाडे आणि "एसकेए' या रेडिओ दुर्बिण प्रकल्पातील संदीप सिरोथीया यांचा सहभाग आहे. 

-काय आहे "आयजर' ? 
- अत्यंत दुर्मीळ रेडिओ लहरी असून, पहिल्यांदाच शोधण्यास यश 
- अणूच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या इलेक्‍ट्रॉनच्या वेगात झालेल्या बदलामुळे त्या उत्पन्न होतात 

- या स्रोतांमुळे काय फायदा होईल ? 
- आकाशगंगेतील विविध भौतिक प्रक्रियांवर प्रकाश टाकणे शक्‍य 
- भविष्यात विविध संशोधनात या लहरींचा वापर होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Research of rare radio waves from Pune researchers Royal Astronomical Society