महिला संवर्गात रेश्मा दडस महाराष्ट्रात पहिली

महिला संवर्गात रेश्मा दडस महाराष्ट्रात पहिली

Published on

महिला संवर्गात रेश्मा दडस राज्यात पहिली

माणच्या सुकन्येचे घवघवीत यश; पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी

दहिवडी, ता. ६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक (२०२४) या परीक्षेत माण तालुक्यातील टाकेवाडी या गावाची सुकन्या रेश्मा जोतिराम दडस हिने घवघवीत यश मिळविले आहे. या परीक्षेत रेश्मा ही महिला संवर्गात राज्यात पहिली आली आहे.
रेश्मा हिचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज वडूथ येथे झाले. उच्च माध्यमिक व पदवीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे झाले आहे. रेश्मा हिने बीएस्सी (इलेक्ट्रॉनिक्स) या विषयातून पदवी घेतली आहे.
पदवीनंतर रेश्मा हिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात रेश्मा हिने महसूल सहाय्यक (२०२५) या पदाला गवसणी घातली, तर दुसऱ्या प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालताना महाराष्ट्रात महिला संवर्गात पहिला क्रमांक मिळविण्याची किमया साधली. या यशाबद्दल रेश्माचे सर्वत्र कौतुक होत आहे.

.............

बहिण-भाऊ राज्यात प्रथम

रेश्मा ही अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील असून, आई-वडील शेती करतात. या परिस्थितीतून पुढे येत रेश्मा हिने राज्यात पहिला क्रमांक मिळविला. यापूर्वी उद्योग निरीक्षक पदाच्या परीक्षेत रेश्मा हिचा भाऊ नानासाहेब दडस यांनीही राज्यात पहिला क्रमांक मिळविला होता, तर रेश्माचा मावस भाऊ बापूराव दडस याने पोलिस उपअधीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवले आहे.
...........
07347
रेश्मा दडस
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com