Pune: रेश्मा कुटे यांची 'फुल्ल आयर्नमॅन' वर मोहोर

Reshma Kute Completes Full Ironman in Vietnam: जुन्नर तालुक्यातील नेतवड गावच्या आणि मुंबई पोलिस दलातील रेश्मा कुटे यांनी व्हिएतनाममध्ये फुल्ल आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करत तालुक्यातील पहिल्या महिला फुल्ल आयर्नमॅन होण्याचा मान मिळवला.
Pune

Pune

esakal

Updated on

कृष्णकांत कोबल

हडपसर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनितीचा आदर्श बाळगणाऱ्या व्हिएतनामच्या भूमीवर आयर्नमॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठीच्या निर्धारित वेळेपूर्वीच कामगिरी यशस्वी करीत सध्या मुंबई पोलिसदलात कार्यरत असलेल्या जुन्नर तालुक्यातील नेतवड गावच्या रेश्मा कुटे या कन्येने 'फुल्ल आयर्नमॅन' वर आपली मोहोर उमटवली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने फुल्ल आयर्नमॅन झालेली जुन्नर तालुक्यातील पहिली महिला ठरली असल्याचा दावा तिने केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com