विमाननगरच्या रहिवाशांनी आमदारां पुढे वाचला समस्याचा पाढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Residents of Vimannagar raised their problems before the MLAs

विमाननगरच्या रहिवाशांनी आमदारां पुढे वाचला समस्याचा पाढा

रामवाडी - विमाननगर सारख्या उच्चभ्रू सोसायट्यातील रहिवासी वाहतुक कोंडी, कचर्‍याचा ढीग, अपुरा पाणी पुरवठा, पदपथावर व्यावसायिकांनी थाटले स्टॉल, खोदलेले रस्ते, बेशिस्त वाहनांची पार्किंग रात्रभर डीजे आवाज, अशा अनेक समस्या त्रस्त झालेल्या रहिवाशांनी आमदार सुनिल टिंगरे यांच्या पुढे समस्या मांडल्या. त्या लवकरात लवकर सोडवल्या जाव्या अशी, मागणी अनिता हनुमंते सह रहिवाशांकडून यावेळी करण्यात आली.

विमाननगर येथील लुंकड Queensland येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विमाननगर मधील 25 सोसायचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. विमाननगर भागात जागोजागी रस्ते खोदण्यात आले काम झाल्यावर ते बुजवून डांबरीकरण करण्यात आले नाही.असमतोल रस्त्यामुळे काही ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे तर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. अशी रस्त्याची बिकट स्थिती झाली आहे.मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाणी येत नाही.

पदपथावर व्यावसायिकांनी स्टॉल उभारले असल्याने गाड्यांच्या गर्दीतून जीव मुठीत घेऊन पादचाऱ्यांना चालावे लागते आहे.वेळेवर कचरा उचला जात नसल्याने दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर कुठे ही बेशिस्तपणे केलेली गाड्यांची पार्किंग मुळे वाहतुक कोंडी वाढत आहे. रात्रभर सुरू असलेल्या डीजेच्या आवाजामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.अशा अनेक समस्या रहिवाशां कडून आमदारांना सांगण्यात आल्या. एक एक करून तुमच्या समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन आमदार सुनिल टिंगरे यांच्या कडून रहिवाशांनी देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सोसायटीचे अध्यक्ष रमेश धोडीया यांनी आलेल्या पाहुण्यां चे व सोसायटीच्या रहिवाशांचे आभार मानले.

आमच्या परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पाणीपुरवठा कचरा वाहतुक अशा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी तक्रार दिल्या तसेच प्रत्यक्ष भेटी घेतल्या कोणी दखल घेत नसल्याने काल आमदारांना सोसायटी मध्ये बोलावून आमच्या सार्वजनिक समस्या त्यांच्या पुढे मांडल्या.

- अजय लोणकर, स्थानिक रहिवासी.

रेसिडेन्सी एरिया हा आता कमर्शियल बनला गेला आहे. रात्रभर रूफ़ टॉप हॉटेल सुरू केल्याने रात्रभर डीजे लावले जातात. हक्काची झोप सुद्धा आम्हा रहिवाशांना मिळत आहे.त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

- रिटा घोष.

Web Title: Residents Of Vimannagar Raised Their Problems Before The Mlas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsMLA
go to top