वाकडेवाडी येथील पीएमसी कॉलनीमध्ये पिण्याचे पाणी सुरळीत करण्याची रहिवाश्यांची मागणी

Residents of PMC Colony in Wakdewadi have demanded to improve drinking water
Residents of PMC Colony in Wakdewadi have demanded to improve drinking water
Updated on

खडकी बाजार (पुणे ) : वाकडेवाडी येथील संभाजीनगर वसाहत पीएमसी कॉलनीमधील इमारत क्रमांक 7 मधील काही सदनिकांमध्ये पिण्याचे पाणी सुरळीत  मिळत नसल्याची तक्रार येथील रहिवाश्यांनी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे अनेकवेळा करूनही पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. जर याची दखल घेतली नाही तर महापालिकेवर येथील रहिवासी हंडा मोर्चा काढणार असा पवित्रा आता रहिवाश्यांनी घेतला आहे.

हे ही वाचा : तपासणी करण्यासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने केली शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती
                   
गेल्या अनेक महिन्यांपासून पीएमसी कॉलनी मधील इमारत क्रमांक ७ येथे पिण्याचे पाणी सुरळीत येत नाही, त्यामुळे येथील रहिवासी संतप्त झाले असून कोणीच दखल घेत नाही. त्यामुळे येथील रहिवासी सुनील जाधव यांनी इतर रहिवाश्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी घेऊन पाणीपुरवठा विभागाला अर्ज केला. मात्र, याकडे पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केले आहे. लवकरात लवकर येथील पाण्याची समस्या सोडवण्यात यावी, अन्यथा हंडा मोर्चा काढण्याचा इशारा जाधव व रहिवाश्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com